Published October 23, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (शुक्रवार) करवीरनिवासिनी श्री अंबामातेची अगस्त्यकृत सरस्वती स्तवन स्वरुपात महापूजा बांधण्यात आली.

करवीर माहात्म्य हा ग्रंथ उलगडतो तो अगस्ती आणि लोपामुद्रा ऋषी दाम्पत्याच्या संवादातून. श्रींची पालखी आजही ज्या घाटी दरवाजाजासमोरील दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, तिथे या दोघांच्या मूर्ती आहेत. करवीरात एके काळी प्रचलित असलेल्या श्री विद्या म्हणजेच श्री यंत्र पूज परंपरेत आजही आचार्य म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा श्री अगस्ती ऋषींनी आपली पत्नी लोपामुद्रेसह करवीरस्थ त्रिशक्तींचे म्हणजेच महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांच्या तोंडून या त्रैमूर्तींची स्तुतीस्तोत्रे बाहेर प्रकटली. त्या स्तवनांपैकी हे श्री महासरस्वतीचे स्तवन आहे.

ही पूजा श्रीपूजक पराग ठाणेकर आणि योगेश जोशी यांनी बांधली.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023