कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे सोमवार दि. १० पासून १७ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. असा निर्णय गडमुडशिंगी ग्रामदक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी शिरगावे होत्या.

तर उपसरपंच तानाजी पाटील यांनी वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहणार आहेत. किराणा दुकाने आणि भाजी मंडई बंद राहणार आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास तसेच दुकाने सुरु केल्यास कडक दंडात्मक कारवाईचा इशाराही ग्राम समितीने दिला आहे.

या बैठकीला मंडल अधिकारी अर्चना गुळवणी, ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे, तलाठी संतोष भिउंगडे आदी उपस्थित होते.