सेवा सोसायटी शेतकर्‍यांची आर्थिक जननी : आ. जयश्री जाधव

0
105

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेवा सोसायटी ही शेतकर्‍यांची आर्थिक जननी आहे. पालकमंत्री सतेज पाटील व सर्व सभासद शेतकरी यांनी विश्वासाने या सोसायटीचा कारभार तुमच्या हातात दिलेला आहे. संस्थेची आणि सभासदांची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामकाज करावे आणि सोसायटीचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

कसबा बावडा येथील श्रीराम सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. आ. जयश्री जाधव म्हणाल्या, सेवा सोसायटीच्या माध्यमातून सर्वाधिक शेतकर्‍यांना फायदा मिळाला पाहिजे. नूतन संचालकांनी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन चांगला आदर्श घालून द्यावा. श्रीराम सोसायटी आणि सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण कायम सहकार्य करू, असे आश्वासन आ. जाधव यांनी दिले.

सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा निश्चित प्रयत्न नवनिर्वाचित संचालक मंडळ करेल, असा विश्वास नूतन संचालक रमेश रणदिवे यांनी व्यक्त केला. आमदार जयश्री जाधव व उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनंत पाटील, उमाजी उलपे, युवराज उलपे, धनाजी गोडसे, राजीव चव्हाण, हिंदुराव ठोंबरे, अनंत पाटील, मारुती पाटील, मिलिंद पाटील, संतोष पाटील, तानाजी बिरेजे, रमेश रणदिवे, विलास वाडकर, शीतल पाटील, सविता रणदिवे, सुभाष गदगडे, दत्तात्रय मासाळ आदी उपस्थित होते.