आता कोल्हापुरातील सर्व्हिसिंग सेंटर्सची होणार तपासणी…

0
79

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरामध्ये सर्व्हिसींग सेंटर मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही याची तपासणी करा. ते सर्व्हिसिंग करताना पाण्याचा मोठया प्रमाणात वापर करतात. त्यांना कमर्शियल दराने आकारणी होते का याची तपासणी करा, अशा सुचना नगरसेविका माधूरी लाड यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिल्या.

यावर सर्व्हिसींग सेंटरचा परवाना आणि त्याला होणारा पाणी पुरवठा यांची संयुक्त तपासणी केली जाईल, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागासाठी दोन टिपर देणार होता. त्याचे काय झाले ? असा प्रश्न नगरसेविका पूजा नाईकनवरे यांनी केला. यावर प्रभागामध्ये कचरा गोळा करण्यासाठी आणि गटारीतील काढण्यात आलेली खरमाती तसेच इतर कचरा उठाव करण्यासाठी वेगळी व्यवस्था करणेबाबत नियोजन सुरु असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.