संजय राऊत यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप

0
133

मुंबई  (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात  तक्रार अर्ज दाखल केला आहे. यात या महिलेने धक्कादायक आरोप केले आहेत. आपल्या मागे माणसं लावणं,  हेरगिरी करणं, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखवणे, यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे.

सन २०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलीस ठाण्यात आणि २०१८ मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही केलेली नाही. पोलिसांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही, असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मागील ७ वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे या महिलेने म्हटले आहे.