सदाभाऊ खोतांचा सवतासुभा

0
67

पुणे (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या कोटयातून विधानपरिषदेवर आमदार झालेले सदाभाऊ खोत यांनी सवतासुभा मांडला आहे. परिणामी भाजपसोबत असलेले घटकपक्षही नाराज असलेल्याचे समोर येत आहे.

कोल्हापूरचे प्राध्यापक एन डी चौगुले यांना रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खोत यांनी उमेदवारी जाहीर केली. चौगुले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे भाजपमधील बंडाळी थोपवण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.

खोत यांना सांगली भाजपच्या राजकारण दूर्लक्ष करत असल्याचे शल्य बोचत आहे. यातूनच ते नाराज आहे. मूळचा चळवळीचा त्यांचा पिंड असल्याने भाजपमधील वातावरणात ते अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. म्हणून त्यांनी भाजपने पदवीधरमधून अधिकृत उमदेवार जाहीर केला असतानाही स्वत:च्या संघटनेचा उमदेवार रिंगणात आणण्याच्या तयारीत आहेत.