सेन्सेक्सने ओलांडला ६० हजार अंकांचा टप्पा

0
12

मुंबई : शेअर बाजारात आजही खरेदीचा उत्साह दिसत असून, सेन्सेक्स निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात आजही चांगली तेजी असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स  ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक ९५.८४ अंकांनी वधारत ५९,९३८.०५  अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक ४२ अंकांनी वधारत १७,८६८ अंकांवर खुला झाला. 

सकाळी ९.२९ वाजता सेन्सेक्स १६१ अंकांनी वधारत  ६०,००८.११ अंकांवर पोहचला होता. त्यानंतर पुन्हा खाली घसरला.  सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १८५ अंकांनी वधारत ६०,०२७.५८ अंकांवर व्यवहार करत होता; तर निफ्टी निर्देशांक ६३ अंकांनी वधारत १७,८८८.३५ अंकांवर व्यवहार करत आहेत.

आज मुंबई शेअर बाजारातील एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अॅण्ड टी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, नेस्ले, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवरग्रीड, सनफार्मा सारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.