ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…

0
91

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता दैनंदिन श्री अंबाबाईचे मंदिर उघडल्यापासून ते देवीच्या सेवेत असायचे. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे, सून, नातवंड असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (दि. २०) रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.