बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोरोना लस प्रभावी असून पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यापासून कोणताही धोका नाही. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी अमित माळी यांनी केले. तसेच सर्वेक्षण पथकांनी लोकांचे गैरसमज दूर करून लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथील जय-मल्हार हॉलमध्ये आयोजित कोवीड लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.

तहसीलदार रमेश शेडगे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सर्वेक्षणात ज्येष्ठांची नोंदणी करत लसीकरणाबाबत जागृती आणि प्रवृत्त करण्यास सांगितले. जि.प. सदस्य प्रा.शिवाजी मोरे अध्यक्षस्थानी होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.चन्नाराम कुमावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम, उपसभापती उज्वला पाटील, माजी सभापती अनिल कुंदरकर, आशासेविका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.

गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. मयुरेश तेली यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक विनोद पाटील यांनी आभार मानले.