आम्हाला घरी पाठवता काय ? : ना. हसन मुश्रीफ

0
814

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभा आज (शुक्रवार) पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, पुढील वर्षापासून पाच लाखांपर्यंतच्या पीक कर्ज बिनव्याज दिले जाईल, अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी अनवधानाने पाच लाख रूपयांचे कर्ज माफ असे म्हणाले. त्यांची ही चूक सभासदांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी केवळ व्याज माफी आहे, कर्ज माफी नाही. कर्ज माफी करून काय आम्हाला घरी पाठवता काय, असा मिश्किल प्रश्न विचारला. यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.