कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदीगड येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी श्री साई हायस्कूलची माजी विद्यार्थिनी व अष्टपैलू खेळाडू सौम्यलता बिराजदार आणि ज्ञानेश्वरी पाटील या दोघींची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही क्रिकेट स्पर्धा दि. ८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

सौम्यलता बिराजदार हिला सलग तिसऱ्यादा, तर ज्ञानेश्वरी पाटील हिला प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. या दोन खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, मानद सचिव विजयराव बोंद्रे, रुपेश खांडेकर, विष्णू चौगुले, विठ्ठल आमले, अजित दळवी, मुख्याध्यापक एस. पी. पाटील, क्रीडा मार्गदर्शक एस. एस. पाटील, विनायक पवार, दीपक सुतार, शिक्षक, कर्मचारी आदींचे मार्गदर्शन लाभले.