कोल्हापूर (प्रतिनिधी) : भूविकास बँक कर्मचारी युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवाजी पेठेतील कार्यकर्ते संजय साळोखे यांची आम आदमी पार्टीच्या शहर संघटकपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई व जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

साळोखे यांनी पक्षाच्या दिल्ली व पंजाब येथील वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व शेतीच्या क्षेत्रातील लोकाभिमुख कार्यामुळे आपण प्रभावित झालो असून, असेच कार्य कोल्हापुरात देखील व्हावे यासाठी पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ‘आप’चा महापौर करण्यासाठी शिवाजी पेठेचे योगदान महत्वाचे असणार आहे. साळोखे यांच्या प्रवेशामुळे ‘आप’ पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अॅड. सी. व्ही पाटील, पारस ओसवाल, डॉ. कुमाजी पाटील, किशोर खाडे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दुष्यंत माने, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, आनंदराव चौगुले, संग्राम पाटील, अश्विनी चव्हाण, संगीता साळोखे, शोभा बोंद्रे, शोभा पाटील, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, रवींद्र ससे आदी उपस्थित होते.