धामोड (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मण शंकर इंगळे यांची जिल्हा ग्रामसेवक संघाच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाली. ग्रामसेवक संघाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात तुळशी धामणी परिसराला हा पहिल्यादा मान मिळाला आहे.

लक्ष्मण इंगळे यांनी गेली अनेक वर्षे राधानगरी तालुक्याचे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे. या नूतन कार्यकारिणीच्या निवडीत जिल्हा सरचिटणीसपदी महेश खाडे, जिल्हा सहचिटणीस बी. एस. पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सरिता चौगले-पाटील यांची निवड झाली. या निवडीला माजी जिल्हा अध्यक्ष एस. डी. पाटील, माजी राज्य सरचिटणीस के. आर. किरुळकर, सरचिटणीस सरदार दिंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.