कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील मयूरी बळीराम पाटील हिची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) दलात निवड झाली.

गृहरक्षक दलाचे जवान बळीराम पाटील यांची ती कन्या आहे. तिला आडूर (ता. करवीर) येथील श्रीगुरु अकॅडमीचे शिक्षक सचिन चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातून तिचे कौतुक केले जात आहे.