आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

0
89

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे राजकीय समझोत्यानुसार लोकनियुक्त सरपंच मनिषा प्रकाश पाटील यांनी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्या गीता भगवान पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून कळे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे यांनी काम पाहिले.  

स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका शिंगाडे यांनी केले. निवडीनंतर सुरेश ठाकरे यांच्या हस्ते सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम पाटील, अजित पाटील, सरदार पाटील, विश्वास पाटील, धैर्यशील पाटील, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, विलास पाटील, भगवान पाटील, पोलीस पाटील युवराज गुरव, संजय गुरव आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.