कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसीप्लेनरी स्टडीजचे विद्यार्थी डॉ. विकास जयवंत माने यांची दक्षिण कोरियातील ग्यांगजू विद्यापीठामध्ये पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली आहे.

डॉ. माने यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठातून पदार्थ विज्ञान विषयामध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ रिसर्च पेपर, ३ बुक चाप्टर व ३ पेटंट प्रसिद्ध केले आहेत. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना दक्षिण कोरियाती निव्हर्सिटीमध्ये ऊर्जा साठवणुकीवर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. संशोधनाचा सर्व खर्च विद्यापीठाकडून केला जाणार आहे.

डॉ. विकास माने यांना रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. दत्तात्रय ढवळे, डॉ. अभिषेक लोखंडे यांचे संशोधनासाठी मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील,  संस्थेचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतूराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, डॉ. आर. एस. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.