संजीवन कॉलेजच्या ३० विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड

0
327

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ईलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेलीकम्युनिकेशन पदवी व मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पदविका विभागाच्या विद्यार्थांसाठी औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन कंपनीमार्फत कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले होते. या कॅम्पस प्लेसमेंटमधून एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  

संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या विद्यापीठास संलग्न असून या विद्यापीठातून शिकवल्या जाणाऱ्या अत्याधुनिक शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त प्रॅक्टिकल ज्ञानाचा फायदा होत असल्याने त्यांना नोकरी मिळणेस सुलभ होत आहे. तसेच महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक वर्ग, कोरोना काळात चांगल्या पद्धतीने दिलेले ऑनलाईन शिक्षण व इतर सुविधा यामुळे कॉलेजमधील अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये आले आहेत.

संजीवन कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील अंतिम वर्षाच्या सर्व मुलांची १०० टक्के  प्लेसमेंट करण्याचा संजीवन कॉलेजचा मानस आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमास संजीवन शिक्षण संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, सीईओ प्राची भोसले यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.