श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न…

0
212

शिरोळ (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आला आहे. शिरोळ तालुक्यामध्ये ही दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे संगम आहे.

सध्या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाणी मंदिरामध्ये शिरल्याने या वर्षीचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा आज (गुरुवार) दुपारी अडीचच्या सुमारास संपन्न झाला. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने मोजक्याच पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. मंदिरातील दत्तगुरुची उत्सवमूर्ती नारायनस्वामी मठ येथे दर्शनासाठी ठेण्यात आली आहे.