मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून जीवनावश्यक गोष्टींच्या किमतींनी सामान्य जनतेची चिंता वाढवली आहे. नुकतेच कांदा आणि बटाट्याच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला होता. त्यातच आता नवीन चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.

घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त द्यावे लागणार आहे.