इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर व परिसरामधील इंग्लिश व मराठी मिडीयम शाळा बिनधास्त सुरू असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासन हे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

शाळेमध्ये येत असताना रिक्षामधून आठ ते दहा विद्यार्थी वाहतूक होत आहे. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला जात नाहीये. शाळेमध्ये पहिली ते आठवी परीक्षा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई या शाळेच्या वर होत नाहीये. शहरातील शाळेमध्ये NMMS ची परीक्षा घेतली जात आहे. या वेळी शाळा व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. याबाबत शिक्षकांकडे विचारणा केली असता ही परीक्षा दिल्ली बोर्डाची आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला शाळांकडून केराची टोपली दाखवली गेली असल्याची चर्चा शहर व परिसरामध्ये आहे.