कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण करूनच, शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आ. चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ती मान्य झाल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे.

आ. जाधव यांनी, मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. यामुळे तिसरी लाट थोपवण्याबरोबर लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबवावी.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील सर्व शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आ. जाधव यांनी केली होती. याला अनुसरूनच राज्यातील मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे येत्या १७ ऑगस्टपासून शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. त्यामुळे आ. जाधव यांच्या या मागणीला यश आले आहे.