व्यापारी, उद्योजकांचे प्रश्न मांडणारा अभ्यासू आमदार हरपला : दीपक पाटील

0
76

टोप (प्रतिनिधी) : सर्वसामान्य, व्यापारी, उद्योजकांचे शासन दरबारी प्रश्न मांडणारा अभ्यासू आमदार हरपला, अशा भावना स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यक्त केल्या. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) तर्फे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्मॅकने जाधव यांच्यावर तयार केलेली चित्रफित दाखवण्यात आली.

यावेळी दीपक पाटील म्हणाले की, आ. जाधव यांनी सर्व व्यापारी आणि उद्योजकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला. मुख्यत: वीज प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.

उपाध्यक्ष एम. वाय. पाटील म्हणाले की उद्योगा संबंधी सर्व प्रश्नांची त्यांना जाण होती. पहिल्यापासूनच ते वीज दर वाढ, कच्च्या मालाची दरवाढ या  समस्यांवर कायम आवाज उठवत होते.

यावेळी माजी अध्यक्ष अतुल पाटील म्हणाले की, अण्णांनी खरोखरच कला-क्रीडा उद्योग, व्यापार, दातृत्व आणि कर्तृत्व या सगळ्या बाबतीत झोकून देऊन काम केले.

यावेळी  स्मॅकचे उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, माजी अध्यक्ष अतुल पाटील, सुरेंद्र जैन, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन सचिन पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धनंजय दुग्गे, उद्योजक रामराजे बदाले, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे सेक्रेटरी प्रदीप व्हरआंबळे यांनी श्रद्धांजली वाहून आठवणींना उजाळा दिला.

या शोकसभेस स्मॅकचे खजानिस जयदीप चोगले, शिरोली सॅण्ड रेक्लमेशन प्लांट चेअरमन नीरज झंवर, स्मॅर्क स्किल ट्रेड प्रमोशन चेअरमन अमर जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशिलकर, रवी डोली, निमंत्रित सदस्य भीमराव खाडे, बदाम पाटील, अविनाश चिकणीस, शेखर कुसाळे, आर. बी. वारनूळकर, उद्योजक राजू लायन्सवाला, पवन रोचलानी आदी उपस्थित होते.