सावर्डे येथील दोन सेवा सोसायटीत ९७ लाखांचा घोटाळा : ३२ जणांवर गुन्हे

0
77

पेठवडगाव (प्रतिनिधी) : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील शिवक्रांती विविध कार्यकारी सेवा संस्थेत ३६ लाख १३ हजार व दत्त विकास सेवा संस्थेत ६१ लाख ३० हजार ६२७ रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस केल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी वडगाव बाजार समिती संचालक नितीन विष्णू चव्हाण, त्यांच्या पत्नी व सरपंच सुरेखा चव्हाण, दोन्ही संस्थेचे सचिव संतोष गुलाबराव पाटील यांच्यासह ३२ जणांवर रविवारी रात्री उशिरा पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक अनिल पैलवान, रघुनाथ भोसले यांनी फिर्याद दिली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे.

या दोन्ही संस्थेतील घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे – भैरवनाथ शंकर पाटील, बापूसाहेब यशवंत भोसले, संजय शिवाजी चव्हाण, सुदाम शिवाजी इंगवले, सुशांत जगन्नाथ पाटील, बाबासाहेब बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब संभा चौगुले, विकास हंबीरराव चव्हाण, विश्‍वास तुकाराम यादव, तानाजी भगवान शेळके, अय्याज इस्माईल मोमीन, सचिन जगन्नाथ कांबळे, आशादेवी रमेश भोसले, कुमार भिमराव पाटील, संभाजी राजाराम चव्हाण, गणपतराव शामराव चव्हाण, सचिन विष्णू चव्हाण, अभय भिमराव चौगुले, गजानन यशवंत खाडे, किरण दिनकर मगदूम, दत्तात्रय आत्माराम पाटील, अजित विजयसिंह देसाई, इकबाल इलाही मुल्ला, संतोष बाबूराव शेळके, भागवत भिमराव कांबळे, सविता माणिक चव्हाण, सुनीता संजय मगदूम (सर्व रा. सावर्डे), कुमार भिमराव पाटील (रा. खोची)