पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

0
8

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज (गुरूवार) दिली.

येत्या २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.