पणुंत्रे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

0
339

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पणुंत्रे येथील महिलांनी प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली. प्रथम फोटोपूजन व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रियांका माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देत सध्याच्या परिस्थितीत महिलांनी कसे जगायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन ब्लॅक पँथरच्या जिल्हाध्यक्ष प्रियांका माने, पोलीस पाटील कल्पना पाटील, जानकी पाटील, ग्रा.पं.सदस्य रेखा पाटील, विजया पोतदार, मंदाकिनी कदम आदीसह महिला उपस्थित होत्या.