यड्राव (प्रतिनिधी) : रुकडी येथे एका वानराने धुमाकूळ घातला आहे. त्याला पकडण्यासाठी वन्यजीव संक्रमण आणि उपचार केंद्र वनविभाग कोल्हापूरचे अमित कुंभार तसेच सहाय्यक सर्फराज पटेल यांची टिम गेली होती. यावेळी त्यांना रुकडीतील पाण्याच्या टाकी परीसरामध्ये वितळलेल्या डांबरामध्ये धामण जातीचा साप अडकलेल्या स्थितीमध्ये दिसला.

या सापाला वनविभागातील सहाय्यक, सर्पमित्र, रेस्क्यू फोर्सचे जवानांनी त्या सापाची त्यातून सुटका केली. तसेच त्या सापाच्या अंगाला चिटकलेले डांबर काढून त्याला सुखरुप सोडण्यात आले. यावेळी शाहरुख मुजावर, श्रेयश धूमाळे, अक्षय मगदूम, मोहसीन फकीर, महेश वागणे, शहानवाज मुल्ला, रोहित चौगुले, अशपाक मुल्ला उपस्थितीत होते.