सावर्डे तर्फ असंडोली येथे छ. शाहू तालिमच्या वास्तू भूमीपूजनाचा शुभारंभ…

0
25

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फे असंडोली येथील बौद्ध समाजातील छ. शाहू तालीम वास्तूच्या भूमीपूजनाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जोतिर्लिंग मंदिराच्या सभोवतलाच्या सुशोभिकरण पेव्हींग ब्लॉकचे उद्घाटन जि.प. सदस्य शिवाजी मोरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य शंकर पाटील, यशवंत बँक संचालक सुधाकर देसाई, भाजपा तालुका प्रतिनिधी प्रतापसिंह काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवाजी मोरे म्हणाले की, छ. शाहू तालमीसाठी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत आ. विनय कोरे यांच्या स्थानिक निधीतून ११ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तरुणांना व्यायामाची सवय लागावी, शरीर बळकट, संरक्षणासाठी सज्ज व्हावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी तालमी सुरु करुन त्यांना पाठबळ दिले. त्यावेळच्या तालमी केवळ कुस्तीची केंद्र नव्हत्या तर संस्काराचे विद्यापीठ आणि संरक्षणाचे सुरक्षाकवच होत्या. अशाप्रकारे ही तालीम सुद्धा कुस्तीचे केंद्र आणि संस्काराचे विद्यापीठ बनावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी ग्रा.पं.सदस्य संभाजी कापडे, यशवंत बँकचे संचालक सुधाकर देसाई, प्रतापसिंह काळे, सरदार पाटील, सरदार काळे, ग्रा.पं. सदस्या माधुरी काळे, अबाजी काळे, विष्णू काळे, विठ्ठल काळे ग्रामस्थ उपस्थित होते.