कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) मार्फत १२ सप्टेंबररोजी घेण्यात आलेल्या नीट २०२१ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चाटे समुहाच्या चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सत्यजीत सरदार  खाडे ६८० गुण मिळवून समुहामध्ये प्रथम आला. तर २ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी या विषयामध्ये ३६० पैकी ३६० गुण मिळविले.

या परीक्षेत चाटे शिक्षण समुहातील विशेष यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –

सत्यशील खाडे (६८० गुण),  निको अगरवाल (६३० गुण),  ध्रुव दापके (६१३ गुण), ओजस कुंभार (६१२ गुण), भक्ती हेबळे (६०० गुण),  शोएब अत्तार (५८१ गुण), फिजा मनेर (५७७ गुण),  साहिल कांबळे (५६७), रविराज पाटील (५६५ गुण), कृपा दधानिया (५६० गुण), आदिती बेंद्रे (५४२ गुण), थिटे अविष्कार (५२७ गुण), वैष्णवी मुगडे (५१६ गुण),  देवराज कडव (५१५ गुण), समृद्धी पाटील (५०३ गुण).

विद्यार्थी पालकांनी चाटे समुहावर दाखविलेला विश्वास आमची जबाबदारी वाढवितो याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज ओळखून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. या कार्यपद्धतीचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध आव्हानात्मक परीक्षांना होईल आणि यशाचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहील, असा विश्वास कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी व्यक्त केला.

चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, क्लासचे सर्व शाखा व्यवस्थापक, प्राचार्य, शैक्षणिक विभागप्रमुख व समुहाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.