सत्यसाई संघटनेतर्फे जिल्ह्यातील ४२ गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

0
133

कळे (प्रतिनिधी) : मानव सेवा हीच ईश्वर सेवा  या भावनेतून श्रीसत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ गावातील पूरग्रस्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या अमृत कलशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीसत्यसाई संघटना मुंबई आणि महाराष्ट्र यांच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमेश पांड्या, आध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू, राज्याध्यक्ष श्रीराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  पुणे येथून आणण्यात आले. जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर तालुक्यातील  ४२ पूरग्रस्त गावात  १२०० हून अधिक लोकांना अमृत कलशाचे वाटप करण्यात आले. या  कलशामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी सुमारे  बारा लाख रूपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी  धर्मेश वैद्य, कृष्णा रेवणकर, बजरंग माळी, अशोक कोकणे, भगवान बुचडे, अॅड. प्रकाश देसाई, कळे पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रमोद सुर्वे, मधुकर जांभळे, दत्तात्रय पाटील, बच्चन लव्हटे आदी उपस्थित होते.