शरद इंजिनिअरिंगमध्ये शनिवारी इम्पेटस टेक्निकल स्पर्धा

0
22

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी इम्पेटस या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. आय.एस.टी.ई., नवी दिल्ली अंतर्गत स्टुडंट चॅप्टर व शरद इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेन्टेशन, रोबो रेस यासह १५ पेक्षा अधिक स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह दोन लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आय.आय.टी. बॉम्बेचे डॉ. राकेश मोटे यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे हे उपस्थीत राहणार आहेत. पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे.

टेक्नीकल पोस्टर प्रेझेंटेशन, कोडपाय (पायथॉन कोडिंग), डिझाईन विथ फ्युशन ३६०, मायक्रोकोडर, कॅडमानिया, वेबविझ् अशा १८ पेक्षा अधिक स्पर्धा होतील. आतापर्यंत देशभरातून दीड हजारापेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोदवला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन संयोजक प्रा. शारदा साळुंखे यांच्यासह प्रा. अवेसअहमद हुसेनी, प्रा. संग्राम दोपारे, प्रा. वर्षा जुजारे, प्रा. शीतल घोरपडे, प्रा. चेतन पाटील, प्रा. उमेश सिध्दार्थ, प्रा. मोहन चिमाण्णा व विद्यार्थ्यांनी केले आहे.