सतेज पाटील यांनी मानले पोलीस दलाचे आभार…

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

सतेज पाटील म्हणाले की, गेली अडीच वर्षे माझ्यासोबत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यरत असणाऱ्या या सर्वांसोबत एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असताना या सर्वांचे सहकार्य मोलाचे होते. आज या सर्वांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च अधिकारी ते विभागातील शेवटचा पोलीस कर्मचारी मन लावून  आणि निष्ठेने काम करत असतात. म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांची जगभरात वेगळी ओळख असल्याचे सांगितले.