‘जिताने का जिम्मा बंटी पाटील लेता है..! (व्हिडिओ)

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यापैकी कोणतीही एक उमेदवारी काँग्रेसला द्यावी, उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी दिली.

काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समारोप प्रसंगी दसरा चौकात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. सध्या पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांंच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ना. पाटील यांनी सांगितले की, पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यापैकी कोणतीही एक उमेदवारी काँग्रेसला द्यावी. त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी काँग्रेसमधील सर्व नेत्यांसह सर्वस्वी माझी राहील. त्याबाबत चिंता करू नये.