सरपंच रितू लालवाणींनी माफी मागावी, अन्यथा : गांधीनगर ग्रा.पं. सदस्यांचा इशारा

0
420

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील सरपंच रितू लालवाणी यांचे पद गेल्यामुळे त्या वैफल्यग्रस्त बनल्या आहेत. त्यामुळे त्या ग्रामपंचायत सदस्यांवर खोटे आरोप करीत आहेत. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्याविरुध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु, असा इशारा आज (रविवार) ग्रा.पं. सदस्यांनी दिला.

यावेळी रितू लालवाणी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केला. वेळोवेळी खोटे प्रोसिडिंग तयार केले. बेकायदेशीर बांधकामांना अभय दिले. त्यांच्यामुळेच गांधीनगरमध्ये अतिक्रमणाचे जंगल उभे राहिले आहे. त्यांच्याभोवती लँडमाफियांची टोळी कार्यरत राहिली. ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी कधीही माहिती दिली नाही. बनावट दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र काढून राज्य आणि केंद्र शासनाची फसवणूक केली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रितू लालवाणी यांना सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकारी नाही. त्यांनी इतर सदस्यांवर चिखलफेक करणे थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला प्रताप चंदवाणी, गणेश देवकुळे, विनोद हुजुराणी, धीरजकुमार टेहल्याणी, सनी चंदवाणी आदी उपस्थित होते.