सरपंच आरक्षण : हातकणंगले तालुक्यात अनेकांना लॉटरी, तर काहींचे पत्ते कट

0
556

टोप (प्रतिनिधी) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व नुकत्याच निवडणूक झालेल्या हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत आज (बुधवार) तहसीलदार कार्यालयात चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. यात अनेकांना लॉटरी लागली, तर अनेकांचे पत्ते कट झाल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर शासनाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे डोळे आरक्षणाच्या सोडतीकडे  लागून राहिले होते. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सरपंचपदाची आपल्याला लॉटरी लागणार हे निश्चित करूनच निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र, आज सोडत जाहीर झाल्यानंतर काहींचे पते कट झाले, तर काहींना अनपेक्षितपणे लॉटरी लागली. त्यामुळे कभी खुशी कभी गम असेच वातावरण निर्माण झाले.

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. यात नुकत्याच झालेल्या २१ ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढील प्रमाणे : –

अनुसूचित जाती –

सावर्डे, कोरोची, तळंदगे, जुने पारगाव, वाठार तर्फे वडगाव, इंगळी

अनुसुचित जाती स्त्री प्रवर्ग –

किणी, रुकडी, नागाव, कबनूर, नरंदे, चंदूर, पट्टणकोडोली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग –

नेज, चोकाक, हेरले, तासगाव, खोतवाडी, अतिग्रे, माले कापूरवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री –

तारदाळ, रूई, दुर्गेवाडी, मजले, मौजे वडगाव, हलोंडी तळसंदे, अंबप.

नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग –

साजणी, तिळवणी, मानगाव, जंगमवाडी, यळगूड, आळते, हिंगणगाव, मुडशिंगी, चावरे, मनपाडळे, निलेवाडी, टोप, कासारवाडी, अंबपवाडी, लाटवडे, खोची.