‘शाहूवाडी’तील ६२ ग्रा.पं.चे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित

0
240

मलकापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ४६ ग्रामपंचायतीसह एकूण १०६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे हंगामी सभापती हंबीरराव पाटील, माजी सभापती सुनिता पारळे, माजी उपसभापती विजय खोत, सदस्य दिलीप पाटील, अमर खोत,  गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांनी शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडतीसाठी गर्दी केली होती. एकूण तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत एका लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आले. खालीलप्रमाणे आरक्षण पडलेल्या ग्रामपंचायतीची नांवे अशी

सर्वसाधारण पुरुष :-

विरळे, उदगिरी, शिवारे, साळशी, भाडळे, अमेणी, तुरुखवाडी, परखंदळे, खुटाळवाडी, कोतोली, कातळेवाडी, येळवण जुगाई, खोतवाडी, माळापुडे, मांजरे, गजापूर, चनवाड, मोसम, भाडळे, मोळावडे, जांबुर – मालगाव, मानोली, कापशी, पिशवी, कोपार्डे, आळतूर, भेंडवडे, सोनवडे, वरेवाडी, विरळे.

सर्वसाधारण स्त्रिया :-  

ससेगाव, करंजफेण, लोळाणे, आंबा, पुसार्ळे, हारुगडेवाडी, उचत, केर्ले, वडगाव, वालूर, चरण, आरुळ, सुपात्रे, शिरगाव, परळी, कासार्डे, भेडसगाव, बजागेवाडी, कडवे, परळे, शिराळे तर्फे वारूण, आकुर्ळे, रेठरे, पाटणे, गावडी, वाडीचरण, सावर्ड खुर्दे, शिवारे, गिरगाव, नेर्ले, पेरीड, माणगाव,

अनुसुचित जमाती :-

येळाणे.

अनुसुचित जाती पुरुष :-

उदगिरी, थेरगाव, सोनुर्ले, पणुंद्रे – म्हाळसावडे, सावर्डे ब्रुद्रुक, शेंबवणे

अनुसुचित जाती स्त्रिया :-

निनाई परळे, आंबर्डे, करंजोशी, निळे, खेडे, नांदारी, घुंगुर.

नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष :-

मालेवाडी, कुंभवडे, बांबवडे, शिंपे, अमेणी, कांडवण, शित्तुर तर्फे मलकापूर, ऐनवाडी – धनगरवाडा, येलूर, ओकोली, करूंगळे, सरूड, बुरंबाळ, सांबू, करंजफेण, शित्तुर – वारूण.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रिया : –

चांदोली, टेकोली, मरळे, गेळवडे, डोणोली, नांदगाव, उखळू, सोंडोली, वारुळ, कातळेवाडी, भेरेवाडी, कोळगाव, सावे.