करवीर तालुक्यात सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणूका पार…

0
135

शिंगणापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणूका आज (गुरुवार) पार पडल्या. यामध्ये बालिंगे गावच्या सरपंच पदी मयूर जांभळे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी पंकज कांबळे यांची निवड करण्यात आली.

हणमंतवाडी येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये यशवंत बँकेचे संचालक संग्राम भापकर यांची सरपंचपदी तर तानाजी नरके यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. हणमंतवाडी येथे शिवसेनाप्रणीत आघाडीची सत्ता आली आहे.

पाडळी खुर्द येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तानाजी  पालकर यांची सरपंच पदी निवड झाली. तानाजी पालकर हे जनसेवा आघाडीचे उमेदवार होते. तर उपसरपंच पदी नरसिंह आघाडीच्या सुवर्णा  पाटील यांची निवड करण्यात आली.