कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजीनगर येथील साईप्रसाद शेलार हे गुजरी येथील विनोद अग्रवाल यांच्या दुकानात सोने खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी दहा ग्रॅम सोने खरेदी केले. परंतु, नजरचुकीने अग्रवाल यांच्याकडून तीस ग्रॅम सोने शेलार यांच्याकडे दिले. हे मिळालेले ज्यादा सोने प्रामाणिकपणे शेलार यांनी परत केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार सराफ संघटनेतर्फे करण्यात आला.

संभाजीनगर येथील महापालिकेच्या जिमचे कोच असलेले साईप्रसाद  शेलार यांनी गुजरी येथील विनोद अग्रवाल यांच्याकडून दहा ग्रॅमचे सोने खरेदी केले. मात्र, त्यांना नजरचुकीने तीसग्रॅम सोने देण्यात आले. यावेळी शेलार यांनी तपासले असता वीस ग्रॅम सोने ज्यादा आल्याचे त्यांना समजले. यावेळी शेलार यांनी लागलीच २० ग्रॅम सोने अग्रवाल यांना परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शेलार यांचा सराफ संघटनेमार्फत  सत्कार करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, माजी नगरसेवक किरण नकाते, विनोद अग्रवाल, निहाज नदेकर, मनोज बहिरशेठ, संतोष नष्टे आदी उपस्थित होते.