कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेची कोतोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते कणेरी सजाचे कोतवाल संतोष गवळी यांची पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी आणि उपाअध्यपदी आसुर्ले सजाचे कोतवाल कमल पाटील यांची निवड करण्यात आली. तर सचीवपदी वेतवडे सजाचे कोतवाल दिपक दळवी यांची निवड करण्यात आली. निवड समीतीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याअध्यक्ष संभाजी पाटील होते.

यावेळी राज्यउपाध्यक्ष युवराज यादव, रघुनाथ खाटांगळे, नंदु मोरे, जग्गनाथ पवार, योगिता पाटील, संभाजी कुंभार,लहू पाडेकर, बंडा गुरव, प्रकाश कांबळे, विक्रम शेवाळे, विनोद कुंभार आदी उपस्थित होते.