गडहिंग्लजमधील संतोष चौगले यांची ‘लेफ्टनंट कर्नल’ पदी निवड…

0
725

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील संतोष चौगले सध्या (रा. काळभैरीनगर, गडहिंग्लज) यांची लेप्टनंट कर्नलपदी निवड झाली आहे. त्यांची मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष चौगले हे २००० साली भारतीय लष्करात भरती झाले होते. सध्या त्यांची पोस्टिंग ‘लखनौ’ येथे असून त्यांचे माध्यमिक शिक्षण साधना विद्यालय, गडहिंग्लज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण शिवराज कॉलेज येथे झाले आहे. एका शेतकरी कुटुंबातील युवकाने अशी गरुड झेप घेतल्याने सगळीकडे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.