संजीवनच्या सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ संघात निवड

0
86

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पन्हाळा सोमवार पेठ येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सहा विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या अश्वमेघ क्रीडा महोत्सव २०२२ या स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाच्या संघातून निवड झाली आहे.

ह्या  स्पर्धा ह्या ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२२ या दरम्यान औरंगाबाद  विद्यापीठ, औरंगाबाद येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करून स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सोलापूर, जळगाव व पुणे या सहा विभागाच्या आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा २१ ते २३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान समर्थ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बेल्हे, जुन्नुर, पुणे या ठिकाणी झाल्या होत्या.

या स्पर्धेतील निवड चाचणीमधून संजीवनच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये कबड्डी महिला संघात स्नेहल पाटील व वैष्णवी पाटील तर व्हॉलीबॉल पुरुष संघात सुदेश बहादुरे व पृथ्वीराज गायकवाड तसेच व्हॉलीबॉल महिला संघात शुभांगी शेटके व अनुजा पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत इंगवले, भास्कर कांबळे, जयंत कुलकर्णी, संजय पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.