Published June 3, 2023

पन्हाळा (प्रतिनिधी) : यंदाही संजीवन विद्यानिकेतन या निवासी शिक्षण संकुलाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशराज सतीश काळे व श्वेता दादासो टेकाळे या दोघांना 92.80 टक्के मिळाले.

द्वितीय क्रमांक- आदित्य चंद्रकांत भोसले (92.60), तृतीय क्रमांक- संस्कार संदेश पावस्कर (87.40), चौथा क्रमांक- शिवम सुनील शिवगण (87.20) , पाचवा क्रमांक- (विभागून) धीरज धनंजय बारकुल आणि श्रेयस विजय गव्हाणे यांनी (87.00)  या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

संजीवन विद्यानिकेतनमधील 42 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये, 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव आणि मुख्याध्यापक एन. आर. भोसले, के. के. पोवार सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. वर्गशिक्षक विजय गव्हाणे आणि विजय यादव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023