पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील संजीवन शिक्षण समूहामध्ये कै. सुनील शिंदे यांच्या स्मरणार्थ व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये संजीवन पब्लिक स्कूलने विजेतेपद, तर संजीवन विद्यालयाला उपविजेतेपद मिळाले.

१७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेता संघ संजीवन पब्लिक स्कूल आणि उपविजेता संघ छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयचा (पन्हाळा) संघ ठरला. हॉकी स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील क्रीडा स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कूलने विजेतेपद तर संजीवन विद्यालयाला उपविजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील हॉकी स्पर्धेमध्ये संजीवन विद्यालय आणि संजीवन पब्लिक स्कूलने अनुक्रमे विजेते, उपविजेतेपद मिळवले. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्षांखाली गटामध्ये संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा संघ विजेता, तर संजीवन पब्लिक स्कूलचा संघ उपविजेता ठरला.

या क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य महेश पाटील, बनश्री बर्मन, उपप्राचार्य बी.आर.बेलेकर, पी. एन.पाटील, शिल्पा पाटील-सांगावकर, के. के. पोवार यांच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन संजीवन शिक्षण समूहाचे क्रीडा विभागप्रमुख सौरभ भोसले व सर्व विभागाच्या क्रीडा शिक्षकानी केले होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागप्रमुख विजय गव्हाणे, जयंत कुलकर्णी, सागर पाटील, संजय पाटील, आनंदराव दिंडे, प्रकाश साळुंखे, नूर मोहम्मद, विशाल कदम, रवींद्र माने, प्रकाश जाधोर, संदीप जाधव, नचिकेत जाधव, प्रमोद काळे, सुदर्शन पाटील, आबिद मोकाशी, कपिल खोत, गणेश पवार, सुदर्शन पाटील, सचिन पाटील, अमित साळुंखे, जे. जे. पाटील यांनी काम पाहिले.