खा. संजय राऊत यांनी घेतली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट…

0
146

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची आज (रविवार) भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेची उमेद्वारी नाकारल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

काल छत्रपती शाहू महाराजांनी, राज्यसभेसाठी गणित जुळवून न आणता पक्ष घोषित करणे हा संभाजीराजेंचा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मतं जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत, असे भाष्य केले होते.  त्याचं पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा होत आहे.

खा. संजय राऊत म्हणाले की, मी छत्रपती शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे, असं सांगितले होते. त्यानुसार मी आज त्यांचे आशीर्वाद घेतले. ठाकरे कुटुंबीय आणि महाराजांचे एक नाते आहे. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन, असं सांगितले असल्याचे संजय राऊत म्हणाले.