संजय राऊत यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट…

0
32

मुंबई (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचे समजते. यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचे समजते आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही. असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here