मुंबई (प्रतिनिधी) : मला पोलिसांनी क्लिन चीट दिल्यानंतर मी मंत्री झालो आहे. या पुढे जर कोणी माझ्यावर आरोप केले तर त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा संजय राठोड यांनी टीका करणाऱ्यांना दिला आहे.

मी चार वेळा मोठ्या मतांनी निवडून आलो आहे. आता मला मंत्री पदाची संधी मिळाली आहे, गेल्या वेळीही मिळाली होती. एक दुर्दैवी घटनेवरून माझ्यावर आरोप करण्यात आले. नैतिक जबाबदारी समजून चौकशी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता. चौकशीनंतर पोलिसांनी मला क्लिन चीट दिली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना सर्व कागदपत्रे पाठवणार असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटल होत की, जरी राठोड मंत्री झाले असले तरी आमचा त्यांच्या विरोधातला लढा सुरूच असेल, असे म्हणत त्या राठोड यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आता यावर राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.