शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आज (मंगळवार) शिरोळ तहसीलदार कार्यालयात पार पडली. यामध्ये ७६४ लाभार्थ्यांचे अर्ज समितीने मंजूर केले आहेत. तर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, समितीच्या सचिव तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२१ अखेर आलेल्या अर्जांवर चर्चा होऊन यामधील मंजुरीसाठी आवश्यक ते निकष पूर्ण करणाऱ्या तालुक्यातील ७६४ लाभार्थ्यांचे अर्ज समितीने मंजूर केले असल्याचे प्रकाश पाटील- टाकवडेकर यांनी सांगितले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतंर्गत येणाऱ्या अपंग आणि विधवा महिलांसाठींचे २५१,  इंदिरा गांधी निराधार योजनेतंर्गत १४०, श्रावणबाळ योजने अंतर्गत ३७३ जणांना लाभ मिळणार आहे. यासाठी एकूण १४६४ अर्ज प्राप्त झाले होते.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य धन्यकुमार सिदनाळे, विजितसिंह शिंदे, आण्णासाहेब बिलोरे, रमेशबापू शिंदे, केशव राऊत, अफसर पटेल, महादेव कोळी, सुजाता पाटील, भालचंद्र लंगरे आदी उपस्थित होते.