कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका घरफाळा प्रकरणात अनिरुद्ध शेट्ये (अधीक्षक) यांचेवर संजय भोसले यांनी कोमल हॉस्पिटल व झुअरी ऍग्रो या दोन मिळकतींना सूट देऊन महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले म्हणून खोटे आरोप पत्र करून त्याला सेवेतून निलंबित केले. त्यांचेवर खोटी फिर्याद  दाखल केली आहे. यांचा शेट्ये यांना मानसिक धक्का बसून ते गेली वर्षभर मानसिक तणावाखाली होते. त्यामुळे त्याच्या दोन्ही किडनी फेल झालेल्या होत्या. दिनांक २२ जुलै रोजी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भोसले यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मी महानगरपालिकेच्या चौकात आमरण उपोषण करणार असा इशारा माजी उपमहापौर भूपाल शेट्ये यांनी दिला आहे.

अनिरुद्ध शेट्ये घरफाळा विभागात २०१७/१८ मध्ये हजर झाले आहेत. कोमल हॉस्पिटलचे प्रकरण २००३ चे आहे या प्रकरणात २००३ ते २०१० ची थकबाकी रक्कम भोसले यांचे कालावधीत म्हणजे २०११ रोजी कमी केली आहे. तर, झुआरीचे प्रकरण ही त्यांचे कालावधीतील आहे

गेली वर्षभर मी महानगरपालिकेकडे या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडत आहे. संजय भोसले यांचा खोटारडेपणा व यांचा मानसिक त्रास शेट्ये सह आरोपपत्र ठेवलेल्या कर्मचारी यांना होत आहे. या आर्थिक नुकसान प्रकरणात भोसलेच दोषी आहे याचा कागदपत्र पुरावा ही  सादर केला आहे याची दखल घेऊन याबाबत अंतिम चौकशी अहवाल विभागाने सादर केला आहे. या अहवालात ज्या कोमल हॉस्पिटल व  झुआरी ऍग्रो या दोन प्रकरणात अनिरुद्ध शेट्ये यांचेवर आरोप पत्र ठेवलेले आहेत त्या दोन्ही प्रकारांत भोसले दोषी आहे असे स्पस्ट झालेले आहे असे भूपाल शेट्ये यांनी निवेदनात म्हणले आहे.

अनिरुद्ध शेट्ये यांचेवर खोटे आरोपपत्र ठेवून व त्यांना निलंबित करून  संजय भोसले यांनीच  त्यांची सामाजिक बदनामी केली आहे. यामुळेच मानसिक तणावाखाली त्यांच्या दोन्ही किडनी फेल झालेल्या होत्या. गेली दोन चार महिने ते डायलेसिसचे उपचार घेत होते.  उच्च न्यायालमध्ये त्यांचेवर झालेल्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध लढा देत होते. मात्र काल त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी, एक २ वर्षाची मुलगी बाळ अनाथ झाले आहे. शेट्ये कुटुंब उध्दवस्त झाले आहे. यास संजय भोसले कारणीभूत व जबाबदार आहेत. भोसले यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मी महानगरपालिकेच्या चौकात आमरण उपोषण करीत आहे व शेट्ये यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता  व संजय भोसले यांचेवर पोलीस कारवाई होई पर्यंत माझा लढा चालू ठेवणार आहे असेही भूपाल शेट्ये यांनी सांगितले आहे.