मुंबई (प्रतिनिधी) : स्वच्छता सर्वेक्षण २०२१ ची यादी जाहीर झाली असून त्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे. या यादीमध्ये नवी मुंबईने चौथा क्रमांक, तर पुणे शहराने पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग पाचव्यांदा प्रथम क्रमाक कायम ठेवला आहे.  

गेल्या वर्षी नवी मुंबईला सर्वेक्षणात तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र, यावर्षी   त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आहे. तर गेल्या वर्षी पुण्याला देशात पंधरावा क्रमांक मिळाला होता. यावर्षी पुणेकरांनी चांगली कामगिरी करत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

इंदूरने सफाई मित्र सेफ्टी चॅलेंजमध्येही अव्वल स्थान मिळवले आहे. त्यासाठी १२ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर राज्य श्रेणीत मध्यप्रदेशाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. मध्य प्रदेशला एकूण ३५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात इंदूर पाचव्या क्रमांकावर आहे.