‘दालमिया’ शुगरच्या असि.जनरल मॅनेजरपदी संग्राम पाटील

0
33

कोतोली (प्रतिनिधी) : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील यांची असि.जनरल मॅनेजर (केन) म्हणून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना दालमिया प्रशासनाने दिले आहे.

संग्राम पाटील यांनी वारणा साखर कारखान्यात १५ वर्षे ऊसविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. २०१४ मध्ये दालमिया कारखान्यात ऊसविकास अधिकारी म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली. शेती विभागातील ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कारखान्यास ‘बोन्सुक्रो’ प्रमाणपत्र मिळवून दिले आहे.

या हंगामापासून सॅालीडरीडॅड या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात त्यांचा सहभाग आहे. शेती विभागातील उल्लेखनीय कामाच्या जोरावर मॅनेजर, वरिष्ठ मॅनेजर, यावर्षी त्यांना असि. जनरल मॅनेजर (केन) म्हणून बढती मिळाली आहे.