संग्राम देशमुख- अमल महाडिक यांच्यात खलबते…

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांनी माजी आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या कार्यालयास भेट देऊन त्यांच्यासोबत निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली. अमलजी महाडिक यांनी देशमुख यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या सर्व यंत्रणेसंदर्भात विस्तृत माहिती दिली.

यावेळी माणिक पाटील चुयेकर, महापालिकेचे माजी स्थायी सभापती आशिष ढवळे, सुलोचना नार्वेकर, विजयेंद्र माने, अनिल पडवळ, शरद महाजन, विशाल पाटील, महेश मोरे, प्रमोद हुदले, नितीन देसाई, कार्यालय प्रमुख कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.